इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील बसस्थानकाची लवकरच ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर पुनर्बांधणी ! – प्रकाश आवाडे, आमदार
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पुनर्बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात आकर्षक कायापालट केला जाईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. आमदार आवाडे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांसह पहाणी केली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
आमदार आवाडे या प्रसंगी म्हणाले, ‘‘हे बसस्थानक आणि परिसर यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची संमती आम्ही आणली होती. आताही हवा तेवढा निधी आपण आणू. हे काम संमत होईपर्यंत आमदार फंडातून ज्या सुविधा देता येतील त्या देऊ.’’ या प्रसंगी कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगर व्यवस्थापक सागर पाटील, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, आनंदा दोपारे, चंद्रशेखर शहा यांसह अन्य उपस्थित होते.