‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यायला हवा ! – अधिवक्त्या मणी मित्तल, सर्वाेच्च न्यायालय
खरेतर ‘द केरल स्टोरी’मध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी थोडेसे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वस्तूस्थिती पुष्कळ भयानक आहे. हिंदूंच्या विरोधात ‘ओ माय गॉड’, ‘पीके’ असे अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले, तसेच ‘आश्रम’सारख्या वेब सिरीजमधून हिंदु धर्म आणि ऋषिमुनी यांचा अवमान करण्यात आला. ‘द केरल स्टोरी’ला विरोध करणारे त्या वेळी गप्प होते. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे.