केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल घोषित !
ठाणे येथील कश्मिरा संखे देशात २५ वी, तर राज्यातील १५ जणांचा श्रेणीत समावेश !
मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०२२ च्या परीक्षेचा निकाल २३ मे या दिवशी आयोगाकडून घोषित करण्यात आला. यामध्ये ठाणे येथील कश्मिरा संखे हिने देशात २५ वा क्रमांक पटकावला आहे, तर महाराष्ट्रातील १५ विद्यार्थी रँकमध्ये आले आहेत.
यश प्राप्त झालेले विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट ‘अ’ अन् गट ‘ब’ मध्ये नियुक्ती होणार आहेत. देशात एकूण ९३३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. देशात इशिता किशोर या विद्यार्थिनीने या परीक्षेत प्रथम स्थान पटकावले. गरिमा लोहिया हिने दुसरे, तर उमा हराथी हिने तिसरे स्थान प्राप्त केले आहे.