भारतात घुसलेल्या जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्यांचा शोध चालू !
कर्णावती (गुजरात) – गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने अल् कायदाशी संबंधित ४ बांगलादेशी जिहादी आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांना साहाय्य करणार्यांचा आता शोध घेतला जात आहे. विदेशातील त्यांच्या प्रमुखांच्या आदेशानंतर हे चौघे जण स्थानिक मुसलमान तरुणांना अल् कायदामध्ये भरती करून आतंकवादी बनवण्याचा प्रयत्न करत होते. या चौघांना बांगलादेशात घातपाताचे प्रशिक्षण देऊन भारतात पाठवण्यात आले होते.
बांग्लादेश में ट्रेनिंग, भारत में घुसे, गुजरात में खड़ा कर रहे थे आतंक का नेटवर्क: ATS ने अल कायदा मॉड्यूल का किया पर्दाफाश, मददगारों की तलाश#Gujarat #AlQaeda #Bangladeshi https://t.co/cwD8mLDs4u
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 23, 2023
आतंकवाद विरोधी पथकाला त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. ते भारतात घुसखोरी करून कर्णावती येथे पोचले होते. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आले. त्यांना हे कार्ड बनवून देणार्यांचा आता शोध घेतला जात आहे. (प्रशासनात देशविघातक लोकांचा भरणा असल्यामुळेच जिहाद्यांचे फावते. अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतात पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी किंवा बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवाया करतात, हे त्यांना स्थानिक धर्मांधांची फूस असल्यामुळेच, हे लक्षात घ्या ! त्यामुळे जोपर्यंत अशांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत भारतातील आतंकवाद पूर्णपणे नष्ट होणार नाही, हे निश्चित ! |