छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवरून १० नक्षलवाद्यांना अटक
स्फोटकांचा मोठा साठाही जप्त !
बिजापूर (छत्तीसगड) – छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवरून १० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एका ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलेली मोठ्या प्रमाणातील स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.
छत्तीसगढ़-तेलंगाना बॉर्डर पर 10 नक्सली अरेस्ट: एक ट्रैक्टर विस्फोटक बरामद, बड़े हमले की थी तैयारी, माओवादी लीडर्स ने मंगवाया था बारूदhttps://t.co/Zhq147Lkm7 #Chhattisgarh pic.twitter.com/5MI4tbMH2w
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 23, 2023
ही स्फोटके त्यांच्या माओवादी नेत्याकडे सोपवण्यात येणार होती. याचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगाणा राज्यांत नक्षलवादी आक्रमणासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५ जण छत्तीसगडचे, तर उर्वरित ५ जण तेलंगाणामधील रहाणारे आहेत.