धार्मिक स्थळांनी ‘सीसीटीव्ही’ बसवावेत आणि सुरक्षा रक्षक नेमावेत ! – पोलीस प्रशासनाची धार्मिक स्थळांना नोटीस
मिरज – मिरज येथील धार्मिक स्थळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने दक्षता बाळगण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. यात धार्मिक स्थळांनी आत आणि बाहेर ‘सीसीटीव्ही’ बसवावेत, सुरक्षा रक्षक नेमावेत, प्रार्थनास्थळांच्या भोवती भिंत उभारण्यात यावी यांसह अन्य सूचना करण्यात आल्या आहेत. प्रार्थनास्थळांच्या संदर्भात काही अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त उत्तरदायी असतील, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. (उरफाटा न्याय ! – संपादक)
मिरज शहर पोलीस ठाण्याच्या परिसरातील मंदिर, मशीद, गुरुद्वारा, बौद्ध विहार, तसेच चर्च या धार्मिक स्थळांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मिरज शहरात काही दिवसांपूर्वी एका मंदिरात तोडफोडीची घटना झाली होती, त्या पार्श्वभूमीवर या नोटिसा देण्यात आल्या आहेत.