कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती : हेल्मेट न वापरणार्यांना १ सहस्र दंड !
कोल्हापूर – जिल्ह्यात रस्ते अपघात वाढले आहेत. यात दुचाकी आणि पादचारी यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही गोष्ट रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. यात प्रथम ८ दिवस कारवाई न करता जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर हेल्मेट न वापरणार्यांना १ सहस्र दंड आकारण्यात येणार आहे. यात प्रथम खासगी आस्थापन, शासकीय कर्मचारी, महाविद्यालयीन कर्मचारी यांचा समावेश आहे. याचे दायित्व संबंधित आस्थापनांवर टाकण्यात आले असून जे कुणी कर्मचारी हेल्मेट वापरत नसतील, त्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे.