शेवगाव (नगर) दंगलीतील जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी ! – विश्व हिंदु परिषद
नगर – येथील शेवगाव या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांकडून सशस्त्र आक्रमण करण्यात आले. येथे समाजकंटकांकडून हिंदु समाजाचा धीर खच्ची करण्याच्या उद्देशाने वारंवार जाणीवपूर्वक सशस्त्र आक्रमण आणि दगडफेक करण्याचे प्रमाण लक्षणीय पद्धतीने वाढलेले आहे. नगर जिल्हा विश्व हिंदु परिषद या घटनेचा तीव्र निषेध करते. दंगल घडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे ? याचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नगर जिल्हा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक) या प्रसंगी विश्व हिंदु परिषद जिल्हा प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख मिलिंद मोभारकर, जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, डॉ. प्रदीप उगले आदी उपस्थित होते.
विश्व हिंदु परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. १४ मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शेवगाव येथे भव्य शोभा यात्रेचे रीतसर शासकीय अनुमतीने नियोजन करण्यात आले होते. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोचली असतांना अचानक हॉटेल सहारा, खाटीकगल्ली आणि मशिदीच्या बाजूने मिरवणुकीवर प्रथम दगडफेक करण्यात आली. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘पी.एफ्.आय. झिंदाबाद’ अशा घोषणा देत सशस्त्र आक्रमण करण्यात आले.
२. यामध्ये सर्व समाजकंटकांकडून शिव्या देत दुकाने, दुचाकी, चारचाकी गाड्या यांची आणि राष्ट्रीय संपत्तीची हानी अन् तोडफोड करण्यात आली, तसेच पेशवेकालीन गणपति मंदिरावर आक्रमण करून हानी केली. मारवाड गल्ली, जैन गल्ली, धनगर गल्ली, वडार गल्ली, भाडाईत गल्ली, राममंदिर बोळ या भागांतील महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.
३. या घटनेमध्ये पोलीसदलातील बांधवांवर आक्रमण करून घायाळ केले. या घटनेचा विश्व हिंदु परिषद निषेध करत आहे. अपमान करण्याची हिंमत या जिहादींनी ओलांडलेली आहे, असे निदर्शनास येते. पोलीसदलावर हात उचलणार्याची गय करू नये.