एकाने चूक केली म्हणून परिवार चुकीचा असे म्हणणे चूक ठरेल ! – चंद्रकांत बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष
पुणे येथील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावर भाजपचा खुलासा
पुणे – कुटुंबातील किंवा परिवारातील एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला असेल, तर त्यासाठी संपूर्ण परिवार किंवा विचारधारा चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही. ‘हनी ट्रॅप’ प्रकरणातील डी.आर्.डी.ओ.चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर असो कि समीर वानखेडे असो आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. सध्या चौकशी चालू असल्याने त्याविषयी अधिक बोलता येणार नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली. ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अडकलेले डॉ. प्रदीप कुरुलकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर टीका करण्यास चालू केले होते. या प्रकरणावर भाजपने पहिल्यांदा सविस्तर भूिमका मांडली.