मुंबई पोलिसांना अज्ञाताकडून धमकी !
आतंकवादी आक्रमणाचा उल्लेख केला
मुंबई – मुंबई पोलिसांना एका व्यक्तीने २१ मे च्या रात्री दूरभाष करून धमकी दिली. त्याने बोलण्यात २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा उल्लेख करत दूरभाष अचानक बंद केला. या प्रकरणी पोलिसांचे अन्वेषण चालू आहे. संपर्क करणार्याने राजस्थानमधून बोलत असून मुंबईवरील आक्रमणाशी संबंधित माहिती स्वतःला दिली जात असल्याचेही पोलिसांना सांगितले, तसेच मुंबई आक्रमणाशी संबंधित माहिती आपल्याला दिली जात असल्याचे पोलिसांना सांगितले. संबंधिताने याआधीही पोलिसांना अशा प्रकारे संपर्क केला होता.
संपादकीय भूमिकाअज्ञातांनी पोलिसांना धमकी देणे, हे अज्ञातांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! |