दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून ‘द केरल स्टोरी’चे कौतुक !
बॉलीवूडला फटकारले
मुंबई – दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘द केरल स्टोरी’चे कौतुक करत बॉलीवूडला फटकारले आहे. या संदर्भात वर्मा म्हणाले, ‘‘आपण एखादी खोटी गोष्ट लोकांना आणि स्वतःला सांगण्यात इतके सराईत झालेलो असतो की, जेव्हा त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन कुणी आपल्याला सत्य सांगते, तेव्हा मात्र आपल्याला धक्काच बसतो. ‘द केरल स्टोरी’च्या अभूतपूर्व यशानंतर बॉलीवूडमध्ये एक भयाण शांतता पसरली आहे, हे यावरून स्पष्ट होते.’’
‘The Kerala Story’ के जरिए रामगोपाल वर्मा ने किया बॉलीवुड पर कटाक्ष, कही ये बात#TheKeralaStoryMovie #TheKeralaStory #ramgopalvarma #Bollywood #indiapublickhabar
देखें पूरी खबरः-https://t.co/WeZOQxNKDA— India Public Khabar (@ipkhabar) May 22, 2023
सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला अभूतपूर्व यश लाभ असून या चित्रपटाने १७ दिवसांत १९८ कोटी रुपये कमावले होते. तो लवकरच २०० कोटी रुपयांची कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.