जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता !
कोल्हापूर – जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने पंचगंगा नदीच्या घाटाची स्वच्छता करण्यात आली. यात ६० पुरोहितांनी सहभाग घेतला. संघाच्या वतीने गेली ६ वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात पालापाचोळा, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा १२ डंपर कचरा संकलीत करण्यात आला. हा कचरा नंतर महापालिकेचे कर्मचारी घेऊन गेले. नदीची स्वच्छता पूर्ण झाल्यावर सर्वांनी नदीची आरती करून कृतज्ञता व्यक्त केली.
पुरोहित संघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. महापुराच्या कालावधीत पुरोहित संघाने पूरग्रस्तांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या होत्या. या प्रसंगी राजाभाऊ कुंभार, अध्यक्ष प्रसाद निगुडकर, स्वप्नील मुळे, ओंकार कारदगेकर, नीलेश कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, सचिन पितांबरे यांसह अन्य सदस्य सहभागी होते.
संपादकीय भूमिकाघाटाची स्वच्छता ब्राह्मण पुरोहित संघाला का करावी लागते ? प्रशासन का करत नाही ? |