मी सत्तेत येऊ नये, अशी सैन्यदलप्रमुख जनरल मुनीर यांची इच्छा !
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा
इस्लामाबाद (पाकिस्तान) – सैन्यदलप्रमुख जनरल मुनीर यांना मी पुन्हा पंतप्रधान व्हावे असे वाटत नाही. एवढेच नाही, तर काही लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत. कदाचित् मला २३ मे या दिवशी पुन्हा अटक होईल, अशी भीती पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘अल् जझीरा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे.
इमरान खान ने एक बार फिर आर्मी चीफ जनरल मुनीर पर गंभीर आरोप लगाए: कहा- आर्मी चीफ जनरल मुनीर नहीं चाहते कि मैं फिर प्रधानमंत्री बनूं, कुछ लोग मेरे कत्ल की साजिश रच रहे#Pakistan #ImranKhan #AsimMunir #PakistanArmy https://t.co/7SjMomYIfD
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 22, 2023
इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असे प्रत्येक पाऊल उचलले जात आहे ज्यामुळे लोकशाही नष्ट होऊ शकते. जनतेसाठी मी रस्त्यावर उतरण्यास सिद्ध आहे. माझ्या काळात देशाची अर्थव्यवस्था जेवढी चांगली होती तेवढीच ती आज वाईट आहे. आपल्या सैन्याला काय हवे आहे ते ठाऊक नाही; कारण त्यांच्या इच्छेखेरीज पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकत नाही.