(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राची मागणी भारतविरोधी !’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचा हिंदुद्वेष !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा हिंदुद्वेषी वक्तव्य केले आहे. यासमवेतच त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. २१ मे २०२३ या दिवशी बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, हिंदु राष्ट्राची मागणी भारतविरोधी आहे. जेव्हा आतंकवादी मला मारण्याची चर्चा करत होते, तेव्हा योगी सरकार शांत बसले होते.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामराज्य हटवण्याविषयीही त्यांनी वक्तव्य केले. रामचरितमानसचा अवमान केल्यानंतर झालेल्या टीकेचे वर्णन करतांना त्यांनी टीकाकारांना ‘आतंकवादी’ संबोधले होते.
“रामचरितमानस पर बयान के बाद मेरी हत्या करने को लेकर इनाम का ऐलान किया गया…, ऐसा करने वाले लोग संत नहीं, गेरुआ वस्त्र पहनने वाले आतंकवादी चेहरे थे।”
स्वामी प्रसाद मौर्य ने फिर दिया विवादित बयान।#swamiprasadmaurya pic.twitter.com/jof7JTJ6ma
— The Hint News (@TheHintNews) May 22, 2023
साधू-संतांकडून मौर्य यांच्यावर टीका
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यावर साधू-संतांनी टीका केली आहे. हनुमानगढीचे महंत राजू दास म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य नेहमीच हिंदु धर्माला लक्ष्य करतात. भगवान श्रीरामाने रामराज्यात सर्वांना सामावून घेतले आहे. रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे वक्तव्य राजकीय असल्याचे सांगितले.
#सपा नेता स्वामी प्रसाद मौर्य के बिगड़े बोल
“बोले साधु-संत और गेरुआ वस्त्र पहनने वाले सारे आतंकवादी..’#SwamiPrasadMaurya pic.twitter.com/5vVopzCNOG— PrimeNews24 (@news24_prime) May 22, 2023
संपादकीय भूमिकाहिंदु राष्ट्राच्या मागणीला भारतविरोधी ठरवणारे राजकारणी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! |