‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …

  • ‘त्या तिघी’ नाट्यप्रयोगात उलगडल्या यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई

  • अभिनेत्री अपर्णा चोथे यांचा एकपात्री नाट्यप्रयोग !

स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ‘त्या तिघी’ एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतांना अभिनेत्री अपर्णा चोथे

रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू हेही स्वातंत्र्ययुद्धात अग्रेसर होते. ते प्रत्यक्षात कार्य करत असतांना त्या तिघांच्या कुटुंबीय आणि पत्नीला काय काय सहन करावे लागले ? खूप हालअपेष्टा सहन करून राष्ट्राचा संसार पुढे नेण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणार्‍या त्या तिघी. म्हणजे सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या तीनही व्यक्तीरेखा साकारत अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ उभा केला.

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’निमित्त हा प्रयोग रंगला. स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयीच्या पत्नींचे योगदान मांडणार्‍या त्या तिघी या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी.. स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ हा अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी एकपात्री नाट्यप्रयोग रंगवला. या नाट्याला रत्नागिरीकर आणि सावरकरप्रेमी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.