२३ मेपासून २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून मिळणार !

बँकांमध्ये गर्दी न करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आवाहन

नवी देहली – देशभरातील बँकांमधून २३ मेपासून २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून मिळण्यास प्रारंभ होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा पालटून घेण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेने यापूर्वी केले होते. याविषयी बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, ३० सप्टेंबरपर्यंत आम्ही ज्या नोटा जमा करू शकणार नाहीत, त्यांच्याविषयी वेगळा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नोटा पालटण्यासाठी बँकामध्ये गर्दी करू नये. शांततेत नोटा पालटण्यास जा; मात्र वेळेचे गांभीर्य ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रिझर्व्ह बँकेने या संदर्भात बँकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये बँकांना उष्णतेच्या पार्श्‍वभूमीवर सावली असलेली जागा आणि लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, किती नोटा पालटल्या आणि किती जमा झाल्या ?, याचा प्रतिदिनचा हिशोब व्यवस्थित ठेवावा, आदी सूचनांचा समावेश आहे.