काँग्रेसकडून गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून कर्नाटक विधानभवनाचे शुद्धीकरण !
भाजपने विधानभवन भ्रष्टाचाराद्वारे अपवित्र केल्याचा आरोप
बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेस पक्षाने येथील कर्नाटक विधानभवनाचे गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून, हवन अन् पूजा करून, तसेच हनुमान चालिसाचे पठण करून शुद्धीकरण केले. भाजपने भ्रष्टाचाराद्वारे विधानभवन अपवित्र केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यापूर्वी जानेवारी मासामध्ये काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी विधानसभा गोमूत्राने स्वच्छ करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले होते.
कांग्रेस ने कर्नाटक विधानसभा का शुद्धिकरण किया: गंगाजल और गौ-मूत्र छिड़का, हनुमान चालीसा पढ़ी; एक विधायक बैलगाड़ी से पहुंचेhttps://t.co/an8slkBxYm#Congress #Karnataka #VidhanSabha pic.twitter.com/8fcaoNfVqH
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 22, 2023
संपादकीय भूमिकाइतर वेळी गंगाजल आणि गोमूत्र यांना अंधश्रद्धा ठरवणार्या काँग्रेसला आता या गोष्टी पवित्र कशा काय वाटू लागल्या ? गोहत्या बंदीचे समर्थन न करणार्या पुरो(अधो)गामी काँग्रेसला गोमूत्राचे महत्त्व कसे काय समजू लागले ? |