(म्हणे) ‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’ – अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग
भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांचे हिंदुद्रोही विधान
न्यूयॉर्क – मी आणि माझे पती बुटके आहोत. आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमचा मुलगा उंच व्हावा; परंतु हिंदूंमध्ये उंची वाढणारा एकही देव नाही. हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी येथे केले. जरना यांच्या ‘वन इन अ बिलियन’ या प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदूंच्या देवतांचा वरील प्रकारे घोर अवमान केल्याचे उघड झाले आहे.
Comedian Zarna Garg makes fun of Hindu gods. pic.twitter.com/IjRxqehN66
— Kreately.in (@KreatelyMedia) May 20, 2023
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
हिंदूंकडून संताप व्यक्त !
गर्ग यांच्या या हिंदुद्वेषी विधानानंतर हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात आला. ‘जरना गर्ग या काही तरी विनोदी करून दाखवण्याच्या नादात फालतू विनोद करतात. आता त्या हिंदूंच्या देवतांची टिंगळटवाळी करण्याचे कृत्य करत आहेत’, अशी प्रतिक्रिया हिंदूंंनी व्यक्त केली आहे. यासह हिंदूंनी जरना गर्ग यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
संपादकीय भूमिकाजागतिक स्तरावर हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाविना पर्याय नाही ! |