प्रत्येक सनातनी व्यक्तीला हिंदु राष्ट्र हवे आहे ! – प्रसिद्ध कथाकार जया किशोरी
इंदूर (मध्यप्रदेश) – मी सनातनी असल्याने हिंदु राष्ट्र झाल्यास मला फार आनंद होईल. सरकार याविषयी काय ते करेल; पण कायदा आणि सुव्यवस्था राखून या गोष्टी झाल्या पाहिजेत. हिंदु राष्ट्र व्हावे, ही प्रत्येक सनातनीची इच्छा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांनी येथे केले.
(सौजन्य : MP Tak)
त्या पुढे म्हणाल्या की, धर्मात राजकारण करता कामा नये. महाभारतात भगवान श्रीकृष्ण स्वतः लढू शकत असतांनाही त्याने तसे न करता पांडवांकडून युद्ध करून घेतले. श्रीकृष्णासारखे असे राजकारण केले, तर ते वाईट नाही. दुर्योधनानेही राजकारण केले होते; परंतु ते योग्य नव्हते. त्यामुळे कुणासारखे राजकारण करायचे आहे ?, हे तुम्हाला ठरवायचे आहे.