मथुरेतील ठाकूर राधा दामोदर मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यास बंदी !
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील ठाकूर राधा दामोदर मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यात बंदी घालण्यात आली आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तसा फलक लावण्यात आला आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हा नियम लागू आहे.
अब मथुरा के मंदिर में भी ड्रेस कोड चस्पा, राधा दामोदर मंदिर में चस्पा हुआ पोस्टर, सही कपड़े पहनकर मंदिर में एंट्री।#Mathuranews pic.twitter.com/wZapEVfmOs
— News18 Uttar Pradesh (@News18UP) May 21, 2023
पूर्ण चंद गोस्वामी यांनी अन्य मंदिरांच्या व्यवस्थापकांनाही असा नियम करण्याचे आवाहन केले आहे. आपले शास्त्र आणि संस्कृती यांत मंदिरांत अशा प्रकारचे कपडे घालून येणे निषिद्ध मानले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाला अन्य दोन मंदिरांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
संपादकीय भूमिकाअसा फलक लावावा लागणे हे हिंदूंना लज्जास्पद ! अन्य पथियांच्या श्रद्धास्थानांच्या बाहेर कधी असा फलक लावावा लागतो का ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते ! |