भाजपच्या नेत्याकडून स्वतःच्या मुलीचा मुसलमान मुलाशी ठरवलेला विवाह स्थगित !
विहिंप, बजरंग दल यांच्यासह समाजातील लोकांनी केलेल्या विरोधाचा परिणाम !
डेहरादून (उत्तराखंड) – विहिंप आणि बजरंग दल यांनी केलेल्या विरोधानंतर भाजपचे उत्तराखंडमधील माजी आमदार तथा पौरी महानगरपालिकेचे प्रमुख यशपाल बेनाम यांनी स्वतःच्या मुलीचा मुसलमान मुलाशी ठरवलेला विवाह स्थगित केला.
(सौजन्य : NMF News)
बेनाम यांनी त्यांच्या मुलीचा विवाह तिच्यासमवेत महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या एका मुसलमान मुलाशी ३ मासांपूर्वी ठरवला होता. २८ मे या दिवशी हा विवाह पार पडणार होता. निमंत्रणपत्रिका वाटून झाल्या होत्या, तसेच विवाहाची इतरही सर्व सिद्धता झाली होती. या प्रेमविवाहाविषयी त्यांनी सर्वांनाच पूर्वकल्पना दिली होती. या विवाहाविषयी कळल्यावर समाजातील अनेकांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध होऊ लागला. अनेकांनी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली बेनाम यांच्या थेट घरावरच मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी हा विवाह सध्या स्थगित केला.
रा.स्व.संघातील अनेक पदाधिकार्यांकडून भ्रमणभाष !
यशपाल बेनाम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पदाधिकार्यांचे भ्रमणभाष आल्याचेही सांगितले.