उत्तरप्रदेशमध्ये हिंदु युवतीला विकण्याचा प्रयत्न करणार्या चौघा धर्मांधांना अटक !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदु युवतीला विकण्याचा प्रयत्न करणार्या चौघा धर्मांधांना पोलिसांनी अटक केली. महंमद आमिर, महंमद जाबिर, महंमद नादिर आणि महंमद वहाब अशी आरोपींची नावे आहेत. महंमद जाबिर हा मुख्य आरोपी असलेला महंमद आमिर याचा पिता आहे. जीशान नावाचा आरोपी फरार झाला आहे.
हिंदू युवती को बेचने जा रहे 4 को यूपी पुलिस ने दबोचा, आमिर ने नाम बदल कर फँसाया था#Lucknow #Uttarpradesh #LoveJihadhttps://t.co/jdBKh5ywGd
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 20, 2023
महंमद आमिर या युवकाने हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतराने हिंदु युवतीला आमिरची खरी ओळख कळली. त्यानंतर आमिरने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. यास पीडित युवतीने नकार दिल्यामुळे आमिरने तिचे अपहरण केले. १९ मे च्या रात्री युवतीने पोलिसांना तिचे अपहरण झाल्याची माहिती दिली, तसेच तिची हत्या होण्याची शक्यता वर्तवत तिला वाचवण्याचे आवाहन केले. त्यानंतर १२५ पोलिसांचा ताफा तिला शोधण्यासाठी निघाला. अपहरणकर्ते तिला घेऊन ऐशबाग रेलवे स्टेशनला गेले आणि तेथे अवध-असम एक्सप्रेसमध्ये चढले. पोलीस पोचेपर्यंत रेल्वे मार्गस्थ झाली होती. पोलिसांनी संपर्क साधून पुढील हरौनी स्थानकावर रेल्वेगाडी थांबवली आणि हिंदु युवतीचा शोध घेऊन अपहरणकर्त्यांना पहाटे ४ वाजता कह्यात घेतले.
आरोपी पिता-पुत्र करत होते ग्रामीण भागांतील युवतींची विक्री !
पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती महंमद जाबिर आणि महंमद आमिर हे पिता-पुत्र ग्रामीण भागांतील युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांना मुंबईत फिरायला नेतात. तेथे मुलीला विकण्याचा व्यवहार केला जातो. त्यानंतर तिला तिची खरेदी करणार्या संबंधित व्यक्तीकडे सोपवले जाते.
संपादकीय भूमिकायावरून धर्मांध लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते ! अशांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय काय ? |