धरणग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करणार्यावर गुन्हा नोंद !
सातारा, २१ मे (वार्ता.) – धरणग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सिद्ध केल्यामुळे मोरे आणि त्याचा अज्ञात सहकारी यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी मोरेवाडी येथील विनोद गोरक्षनाथ मोरे यांनी ९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत अज्ञात सहकार्याच्या साहाय्याने बनावट धरणग्रस्त प्रमाणपत्र सिद्ध केले, तसेच हे बनावट प्रमाणपत्र पोलीस भरतीमध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवेदनासमवेत जोडून याचा अपलाभ घेतला. परिणामत: पोलीसदलाची फसवणूक केली. यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाअयोग्य कृती करणार्यांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! बनावट प्रमाणपत्र सिद्ध करणार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |