सातारा येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राजलक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर युवतींचे प्रबोधन !
सातारा, २१ मे (वार्ता.) – येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहामध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे प्रक्षेपण चालू आहे. चित्रपट संपल्यानंतर बाहेरच्या बाजूला हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने चित्रपट पहाणार्या युवतींचे प्रबोधन करण्यात येत आहे. याला युवतींकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे.
‘द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे देशातील ‘लव्ह जिहाद’चे वास्तव समोर आले आहे. हिंदूंनी स्वभाषा, स्वधर्म यांविषयी किती जागृत असायला हवे ? हे या निमित्ताने लक्षात येते. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू मानून तिचा उपयोग ‘जिहाद’साठी करण्याचे षड्यंत्र या चित्रपटामुळे उघड झाले आहे. सत्य घटनांवर आधारीत साहित्याला चित्रपट म्हणता येणार नाही; कारण ते वास्तव आहे आणि ते अत्यंत विदारक आहे.
गत १ आठवड्यापासून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. वैभव पिसाळ अन् श्री. मयूर जामदार हे युवतींचे प्रबोधन करत असून त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामुळे युवतींसाठी धर्मशिक्षणवर्ग, प्रशिक्षणवर्ग यांना समाजातून मागणी वाढत आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी पाहू नका, तर तुम्ही स्वत: जागृत व्हा आणि इतरांनाही जागृत करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे एक तिकीट १०० रुपये आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. वैभव पिसाळ आणि श्री. मयुर जामदार यांनी स्वखर्चाने ४०० हून अधिक युवतींना हा चित्रपट दाखवला, तसेच चित्रपटस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथांचे वितरण करण्यात आले. याला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.