अमरावती येथे ‘हिंदू एकता दिंडी’ उत्साहात पार पडली !
अमरावती – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत अंबानगरी अमरावती येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. शक्तीपीठ काली माता मंदिराचे पिठाधीश्वर पू. श्री शक्ती महाराज, ह.भ.प. पातशे महाराज, प्रसिद्ध उद्योजक चंद्रकुमार जाजोदीया यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत् पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
दिंडीच्या शेवटी गोपाळकृष्ण मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या जयघोषामध्ये दिंडीचे सभेमध्ये रूपांतर झाले. दिंडीच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता राजेंद्र पांडे आणि सनातन संस्थेचे पराग बिंड यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित केले अन् श्री शक्ती महाराज यांनी उपस्थितांना आशीर्वचवनपर मार्गदर्शन केले.
सहभागी संघटना
हिंदु क्रांती सेना, श्रीराम सेना, अखिल भारतीय ब्राह्मण महासभा, हिंदु महासभा, राष्ट्रीय बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु जागरण मंच, रा.स्व. संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग वेदांत सेवा समिती, एकविरा देवी मंदिर संस्थान, श्री अंबादेवी मंदिर संस्थान, जनार्दन स्वामी मंडळ, जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था, कला साधना बहुउद्देशीय संस्था, तसेच शिवसेना आणि भाजप हे पक्ष
विशेष क्षणचित्रे
१. दिंडीच्या वेळी पाऊस चालू झाल्यावर उपस्थित संत, धर्मप्रेमी यांनी वरूणदेवतेला प्रार्थना केल्यावर काही वेळातच पाऊस थांबला. त्यानंतर वातावरण अल्हाददायक झाले.
२. उपस्थित मान्यवरांनी ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आयोजन आदर्श आणि शिस्तबद्ध असते’, असे कौतुक केले.
या दिंडीची आकर्षणे
• स्वरक्षण प्रात्यक्षिके
• पारंपरिक वेशभुषेमध्ये प्रभावी संदेश देणार्या बालकांचे पथक
• कला साधना बहुउद्देशीय संस्थेचे गरब्यातील विकृती
रोखण्याचा संदेश देणारे पथक
• प्रथमोपचार पथक
• डोक्यावर तुळस आणि कलश घेतलेल्या महिलांचे पथक
• सनातन संस्थेची छत्री आणि टोपी यांचे पथक