छत्रपती संभाजीनगर येथे धार्मिक स्थळांची विटंबना करणारी हिंदु महिला कह्यात !
विटंबना करणारी महिला मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा पोलिसांचा दावा !
छत्रपती संभाजीनगर – येथील सातारा, पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा या ३ ठिकाणी २ धार्मिक स्थळांसह एका धार्मिक प्रतिमेची एका महिलेने विटंबना केली. पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रीकरणाच्या साहाय्याने २ घंट्यांत तिला शोधून कह्यात घेतले. ती टपाल विभागात टपाल साहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
पोलिसांनी ही महिला हिंदु असल्याचे सांगून मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले. यापूर्वीही तिने असे प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील श्रीराम चौक येथे या महिलेने अंडी फेकल्याचे समजले. नागरिकांनी त्वरित हा परिसर स्वच्छ केला होता.
संपादकीय भूमिकाविटंबना करणार्यांना नेहमीच मानसिक आजार कसा काय झालेला असतो ? मानसिक आजार असलेले अन्य गुन्हे न करता धार्मिक स्थळांची विटंबना करण्याचेच गुन्हे नेमके कसे काय करतात ?, हे एक कोडेच आहे ! |