५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंद्रपूर येथील कु. रागिणी राहुल अवताडे (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. रागिणी राहुल अवताडे ही या पिढीतील एक आहे !
कु. रागिणी राहुल अवताडे (वय १० वर्षे) हिची आई आणि साधिका यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. रोहिणी अवताडे, चंद्रपूर (कु. रागिणीची आई)
१. जन्मापूर्वी
‘गर्भधारणा झाल्यावर मला ‘श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन करावे’, असे वाटत असे. त्यामुळे मी २ – ३ वेळा भगवद्गीता वाचली.
२. जन्म ते ५ वर्षे
२ अ. देवाची ओढ : चि. रागिणी रांगत देवघराजवळ जाऊन बसायची. जेव्हा मी श्लोक म्हणायचे, तेव्हा तीही माझ्या समवेत श्लोक म्हणायची.
२ आ. प्रेमभाव
१. ती घरातील कोणताही खाऊ सगळ्यांना वाटून मगच स्वतः खाते.
२. आमच्या घरासमोर गाय दिसल्यावर ती तिला खाऊ घालते आणि कुत्र्यांच्या पिल्लांनाही बिस्किटे खायला देते.
३. वय ८ ते १० वर्षे
३ अ. व्यष्टी आढावा चालू झाल्यानंतर जाणवलेले पालट : पूर्वी तिने कोणतेही काम केले, तर ती घेतलेल्या वस्तू तशाच टाकून द्यायची. तिचा व्यष्टी आढावा चालू झाल्यापासून तिच्यात पालट झाला. आता ती कपड्यांच्या घड्या करणे, चपला व्यवस्थित ठेवणे, शाळेतून आल्यावर स्वतःचा डबा आणि पाण्याची बाटली दप्तरातून काढून ठेवणे, अशा कृती स्वतःहून करते.
३ आ. रागिणी दिवसातून ४ – ५ वेळा जयघोष करते.
३ इ. चुकांविषयी संवेदनशीलता : ती स्वतःच्या चुका व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगते आणि माझ्या चुकांचीही मला जाणीव करून देते. तिच्याकडून चूक झाली असेल, तर ती लगेच प्रायश्चित्त घेते.
३ ई. तिला ईश्वर आणि क्रांतीकारक यांच्या गोष्टी सांगितल्यावर तिच्या डोळ्यांत भावाश्रू येतात. तिला भगवंताच्या (श्रीकृष्ण, महादेव) गाण्यावर नृत्य करायला आवडते.
३ उ. तिला संस्कृत व्यवस्थित वाचता येत नसूनही तिचा भगवद्गीतेचा १२ वा अध्याय तोंडपाठ आहे.
३ ऊ. क्षात्रतेज : ‘मला सैन्यात भरती व्हायचे आहे’, असे रागिणी म्हणते. मी जेव्हा ‘ऑनलाईन’ स्वसंरक्षण वर्गात सहभागी होते, तेव्हा ती माझे पाहून लाठी-काठी, दंड, साखळी प्रकार करत असे. तिच्यात क्षात्रतेज आहे.
४. कु. रागिणीचे स्वभावदोष : आळस, चालढकलपणा.’
प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाशीर्वादामुळे माझ्या मुलीवर संस्कार होत आहेत, त्याबद्धल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
सौ. सत्याली देव, चंद्रपूर येथील साधिका
१. ‘रागिणीचे बोलणे पुष्कळ नम्र आणि मंजुळ आहे.
२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘माझ्याकडे कु. रागिणीचा व्यष्टी साधनेचा आढावा आहे. ती आढाव्यात तिच्या चुका ५ टप्प्यांत (टीप) सांगते आणि भावजागृतीचे प्रयोगही घेते. तिने आढाव्यात येण्यास प्रारंभ केल्यावर मी तिला सांगितले, ‘‘तू १ – २ दिवस इतर बालसाधक कसा आढावा देतात, ते ऐक आणि मगच तू जे प्रयत्न करतेस, ते सांग.’’ रागिणीने दुसर्याच दिवसापासून सगळे प्रयत्न करून आढाव्यात सांगितले आणि ५ टप्प्यांत चूकही सांगायला प्रारंभ केला. आढावा ‘ऑनलाईन’ असून ती नियिमत आणि वेळेत आढाव्याला जोडते.
टीप – ‘चूक काय झाली ? त्यामागे स्वभावदोष कोणता होता ? चुकीचा परिणाम स्वतःवर किंवा समष्टीवर काय झाला ? चूक पुन्हा होऊ नये, यासाठी उपाययोजना आणि पापक्षालन होण्यासाठी प्रायश्चित्त काय घेतले ?’, अशी पाच टप्प्यांत चूक लिहितात.
३. जिज्ञासू वृत्ती : तिला मंत्रजप आणि देवीकवच ठाऊक नव्हते. तिने आढावा संपल्यावर त्याबद्दल त्वरित विचारून घेतले.
४. देव आणि गुरु यांच्याप्रती भाव : तिचा देवाप्रती भाव आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी तिला फारसे ठाऊक नसतांनाही तिची त्यांच्यावर श्रद्धा आहे. ती गुरुस्मरणही करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २.४.२०२३)