श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणार्यांवर कठोर कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद
पनवेल – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणारे आणि राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांवर आक्रमणे करणारे दंगलखोर यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने एका पत्रकाद्वारे केले आहे. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, हिंदु धर्मियांची जी काही दुकाने फोडली, लुटली किंवा जाळली जात आहेत, त्याची हानीभरपाई शासनाने करावी. कायदा केवळ हिंदूंनी पाळायचा आणि अन्य धर्मियांनी तो पायदळी तुडवला तरी चालेल, हे चालणार नाही. ‘हिंदूंवर आक्रमण केले, तरी काही हरकत नाही’, अशी पुरोगामी आणि धर्मांध यांची भावना झाली आहे. हिंदूंवर आक्रमणे होत असतांना पुरोगाम्यांना हसू येते. ही गोष्ट संपूर्ण हिंदु समाजाच्या लक्षात आणून देण्यासाठी शिवभक्तांनी पुढे यावे.