(म्हणे) ‘नगर येथे काही शक्ती धर्माच्या नावाने दंगली करत आहेत !’ – शरद पवार
शरद पवार यांच्याकडून नेहमीचीच दिशाभूल !
नगर (जिल्हा पुणे) – येथे काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत आहेत. शेवगावला २-३ दिवस बाजारपेठ बंद होती. धर्माच्या नावाने अंतर वाढवले जात आहे. नगर जिल्हा ‘पुरोगामी जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. काही शक्ती धर्माधर्मांत अंतर वाढवून संघर्ष वाढवत आहेत. त्या शक्तीशी संघर्ष करण्याचे आव्हान माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे, असे द्वेष वाढवणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २१ मे या दिवशी नगरमध्ये बोलत होते. (दंगल धर्मांधांनी केली आणि हिंदूंना त्याचा त्रास झाला; मात्र अशी वक्तव्ये करून पवार ‘दंगलीला हिंदूंच उत्तरदायी आहेत’, असे भासवण्याचा प्रयत्न करतात ! – संपादक)
कर्नाटक येथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करून द्वेष पसरवला. कर्नाटकात सरकार होऊ शकते, तर देशातील कोणत्याही राज्यात होईल. यासाठी प्रयत्न करणे आपले दायित्व आहे, असेही ते पुढे म्हणाले.
संपादकीय भूमिकाशेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून दंगल केली. असे असतांना पवार त्यांचे नेहमीचे ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हा प्रकार काही थांबवत नाहीत ! मुंबईत वर्ष १९९२ मध्ये हिंदूबहुल भागात साखळी बाँबस्फोट झाले असतांना मुसलमानांच्या परिसरातही स्फोट झाला आहे’, असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत, हे पवार कधी लक्षात घेणार ? |