नाटे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणेआजी (वय ९७ वर्षे) यांच्यात जाणवलेले पालट !

‘माझ्या सासूबाई पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणे या नाटे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथे रहातात. २६.३.२०२२ या दिवशी मी आणि माझे कुटुंबीय पू. आजींना भेटण्यास नाटे येथे गेलो होतो. त्या वेळी मला पू. आजींमध्ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

पू. (श्रीमती) सुशीला शहाणे

१. आम्हाला भेटल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला होता. त्यांचा तोंडवळाही उल्हसित वाटत होता.

२. पू. आजींचे तळहात गुलाबी आणि मऊ झाले आहेत.

३. पू. आजींच्या उपनेत्राकडे पाहिल्यावर त्यात पुष्कळ भाव जाणवतो.

४. पू. आजींना त्यांच्याविषयी काहीही विचारले, तर त्या सांगतात, ‘‘मी पुष्कळ आनंदात आहे.’’

५. ‘त्यांचा प्रवास आता निर्गुणाकडे होत आहे’, असे मला वाटते.’

– सौ. कविता रविकांत शहाणे (सून), रत्नागिरी (३०.३.२०२२)