क्रोध

१. क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ६३

अर्थ : रागामुळे अत्यंत मूढता येते, म्हणजे अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की, बुद्धीचा, म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.

२. काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ३७

अर्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणाला, ‘रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा पुष्कळ खादाड, म्हणजे  भोगांनी कधीही तृप्त न होणारा आणि मोठा पापी आहे. ‘हाच या विषयातील वैरी आहे’, असे तू जाण.’

३. शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक २३

अर्थ : जो साधक हे मनुष्यशरीर धारण केलेले असतांनाच काम-क्रोध यांमुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी आणि सुखी होय.’

(साभार : गीता स्वाध्याय, एप्रिल – मे २०२३)