धर्मांधांचा त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील मंदिरात प्रवेश आणि हिंदूंचा निद्रिस्तपणा !
१. धर्मांधांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाचे बोटचेपे धोरण !
‘नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. १३.५.२०२३ या दिवशी तेथील ‘शिवपिंडीवर हिरवी चादर चढवायची आहे’, म्हणून काही धर्मांधांनी मंदिराच्या उत्तर दारातून बलपूर्वक गर्भागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक स्वतः शहरात आले आणि त्यांनी विविध समाज घटकांशी म्हणे चर्चा केली. पोलीस अधीक्षकही काही दिवस त्र्यंबकेश्वरमध्ये होते. मला एक गोष्ट लक्षात येत नाही की, येथे सर्व गटांशी बोलण्याचा संबंध येतो कुठे ? धर्मांधांनी थेट हिंदूंच्या पवित्र मंदिरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच गृहमंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असतांना परत खुशमस्करी कशासाठी ? त्यामुळेच धर्मांधांच्या लेखी महाराष्ट्र पोलिसांची काही किंमत रहात नाही. ‘धर्मांधांना उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचीच भाषा समजते’, असे कुणाचे मत झाले, तर चुकीचे ठरेल का ? येथेही त्याच पद्धतीने वागावे लागेल.
हिंदूंनाही मशीद आणि मदरसे यांमध्ये प्रवेश करता येईल का ? ते तेथे आरती, होमहवन किंवा सत्यनारायण यांसारखे धार्मिक विधी करू शकतील का ? जर त्यांनी असे करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला धर्मांधांचा प्रतिसाद कसा असेल ? हे प्रत्येक हिंदूला ठाऊक आहे.
धर्मांधांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी, नंतर अकोला, शेवगाव आदी ठिकाणी दंगली केल्यानंतर आता त्र्यंबकेश्वरच्या प्रसिद्ध मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी योगायोगाने घडल्या, असे वाटत नाही.
२. ‘लँड (भूमी) जिहाद’च्या माध्यमातून धर्मांधांचे सार्वजनिक ठिकाणांवर अतिक्रमण !
या घटनेला धर्मांधांची ‘लँड जिहाद’ची मानसिकता उत्तरदायी आहे. तत्कालीन काँग्रेस शासनाने धर्मांधांना केवढे मोठे केले, याची काही उदाहरणे बघूया. मुसलमानांच्या वक्फ बोर्डाकडे भारतीय सैन्य आणि भारतीय रेल्वे यांच्यानंतर सर्वाधिक भूमी आहे. त्यानंतर हिंदूंच्या १ सहस्र २५० मंदिरांवर अतिक्रमण करून त्यांची भूमीही धर्मांधांच्या कह्यात आहे. यासमवेतच नदी, गड, सरकारी आणि गायरान भूमी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा, तसेच हिंदूंच्या मोकळ्या जागा यांवरही धर्मांधांनी उघडपणे अतिक्रमणे केलेली आहेत. या माध्यमातून त्यांनी उघड उघड ‘लँड जिहाद’ कृतीत उतरवला आहे.
३. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये धर्मांधांच्या प्रवेश प्रकरणाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा निषेध !
धर्मांधांनी हिंदूंच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या विरोधात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ब्राह्मण पुरोहित वर्ग आणि महाराष्ट्र मंदिर संघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या स्तरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. यासमवेतच स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ४ धर्मांधांना अटक झाली. ‘हिंदू निद्रिस्त असल्याने धर्मांध मुसलमान असे करण्याचे धाडस करतात. आपण वेळीच पेटून उठलो नाही, तर उद्या पंढरपूर, कोल्हापूर, सिद्धिविनायक अशी महत्त्वाची मंदिरे गमावण्याची वेळ हिंदूंवर येईल. त्यामुळे हिंदूंनी एकत्रित येऊन संघटितपणे विरोध केला पाहिजे’, असे आवाहन भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्रीही आहेत. त्यांनी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करून अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या व्यक्तीकडे या घटनेचे अन्वेषण दिले. या प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा घटनांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी हे अन्वेषण केवळ ४ धर्मांध मुसलमानांपर्यंत मर्यादित ठेवू नये, तर ‘यामागील त्यांचा हेतू काय ? असे करण्यामागे कोणत्या संघटना उत्तरदायी आहेत ? त्यांना आर्थिक पाठिंबा कोण देतो ? त्यांना राजकीय वरदहस्त कुणाचा आहे ?’ या सर्व गोष्टींचे अन्वेषण बारकाईने करावे. ‘असे करण्यामागचा हेतू काय ?’ हेही पोलीस आणि विशेष अन्वेषण पथक यांनी समजून घ्यावे.
४. हिंदूंनी त्यांची पवित्र मंदिरे टिकवण्यासाठी संघटितपणे धर्मांधांची मानसिकता वैध मार्गाने मोडणे आवश्यक !
या घटनेच्या विरोधात पुरोहित महासंघाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. संपूर्ण भारतभरात १२ ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. हे धर्मांधांसह संपूर्ण जगाला ठाऊक आहे. असे असतांना धर्मांधांनी आताच त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा, हे काही पटत नाही. ‘एखाद्या हिंदूने मुसलमानांच्या प्रार्थनास्थळाच्या संदर्भात असे कृत्य केले असते, तर त्यांनी हा प्रश्न कसा हाताळला असता ? याचा हिंदूंनी कुंभकर्णी झोप सोडून विचार करावा आणि धर्मांधांची मानसिकता मोडून काढावी’, असे आमदार नितेश राणे म्हणतात. हिंदू संघटित झाले, तरच त्यांच्या पुढच्या पिढीला १२ ज्योतिर्लिंगे, चारधाम अशी पवित्र धार्मिक स्थाने पहायला मिळतील. अन्यथा त्यांची महती चित्रातून सांगावी लागेल. हिंदूंवर ही वेळ दुर्दैवाने येऊ नये. यासाठी प्रभावी संघटन करून केवळ वैध मार्गाने या घटनेचा निषेध करावा, तसेच सरकार, प्रशासन, पोलीस आणि राजकीय पक्ष यांना हिंदूंच्या बाजूने उभे रहाण्यास भाग पाडावे.
आश्चर्य म्हणजे एक नितेश राणे सोडले, तर अन्य जन्महिंदु राजकारणी, पत्रकार, इतिहासतज्ञ आणि धर्मनिरपेक्षतावादी सध्या कसे शांत आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु !
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१८.५.२०२३)
संपादकीय भूमिकाहिंदूंनी चुकून कधी कोणत्या मशिदीत प्रवेश केल्यास पोलीस त्यांची नेहमीची बोटचेपी भूमिका घेतील का ? |