वाशी येथे ‘जयोस्तुते’ कार्यक्रमाचे आयोजन !
नवी मुंबई – स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना गीतरूपी मानवंदना देणारा ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. २३ मेच्या रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विवेक व्यासपीठ आणि सावरकर विचार मंच, नवी मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २८ मे या कालावधीत ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर स्वा. सावरकर यांच्या विचारांच्या प्रसारार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम विनामूल्य असला तरी प्रवेशिका आवश्यक असणार आहे. प्रवेशिकेसाठी सावरकर विचार मंचाचे नवी मुंबईचे अध्यक्ष संतोष कानडे यांना ९९३०४१०००१ या दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.