बंगालमध्ये चित्रपटगृहांच्या मालकांना चित्रपट न दाखवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांच्या धमक्या !
‘द केरल स्टोरी’चे निर्माते विपुल शहा यांचा आरोप !
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर अवैधरित्या बंदी घालण्यात आली आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे. ‘जर तुम्ही तिकीटविक्रीच्या खिडक्या उघडल्या, तर तुमचे चित्रपटगृह सुरक्षित रहाणार नाही’, अशा धमक्यांचे दूरभाष चित्रपटगृहांच्या मालकांना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून येत आहेत, असा आरोप चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी केला. बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत बंदी घातली होती. त्याला विपुल शहा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने ही बंदी उठवण्याचा आदेश दिला; मात्र तरीही तेथे चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामागे वरील कारण असल्याचा आरोप शहा यांनी केला.
विपुल शहा पुढे म्हणाले की, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असून चित्रपटगृहांचे मालक त्यांना मिळणार्या धमक्यांविषयी उघडपणे बोलत नाहीत. हा चित्रपट दाखवण्याची त्यांची इच्छा आहे; परंतु त्यांना अनुमती दिली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असे प्रकार घडणे अतिशय चुकीचे आहे.
‘Theatre owners are getting threats’: The Kerala Story producer Vipul Amrutlal Shah says there is an ‘illegal ban’ on the film in West Bengal
https://t.co/pZ6S9T40qH— OpIndia.com (@OpIndia_com) May 21, 2023
चित्रपगृहाच्या मालकांना मिळत आहेत धमक्या ! – भाजपच्या नेत्याचाही आरोप
भाजपचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी आरोप केला आहे की, बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवला जात नाही. राज्यात चित्रपटावरील बंदीच्या पूर्वी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद लाभत होता. कोलकातामध्ये स्थानिक प्रशासन चित्रगटगृहांच्या मालकांना धमकावत आहे. ‘जर चित्रपट प्रदर्शित केला, तर दंडात्मक कारवाई केली जाईल’, अशी धमकी दिली जात आहे. हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. न्यायालयाने याची नोंद घेतली पाहिजे. जर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा असा अवमान करत असेल, तर येथे कायद्याचे राज्य किती कमकुवत आहे, हे लक्षात येते.
बंगालमधील परिस्थितीमध्ये अद्याप कोणताही पालट नाही ! – चित्रपट वितरक
बंगालमधील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे वितरक सतदीप साहा म्हणाले की, परिस्थितीमध्ये कोणताही पालट झालेला नाही. अजूनही कोणत्याही चित्रपटगृहाच्या मालकाने चित्रपट प्रदर्शित करण्यास होकार दर्शवलेला नाही.
संपादकीय भूमिकाबंगालमधील हिंदुद्वेषी आणि धर्मांध मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही ! अशा पक्षाला निवडून देणार्या बंगालमधील हिंदूंना पुढे धर्मांधांकडून मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, तर आश्चर्य वाटू नये ! |