अकोला दंगलीच्या प्रकरणी अरबाज खान याला अटक !
अकोला – दंगल प्रकरणात प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असणार्या अरबाज खान याला पोलिसांनी अटक केली. ज्या पोस्टमुळे येथे दंगल झाली, ती पोस्ट अरबाज खान याने इंस्टाग्रामवर प्रसारित केल्याचा पोलिसांना संशय आहे. खानने अवैध जमाव जमवल्याचाही आरोप पोलिसांनी केला आहे. या जमावाने नंतर शहरात अनेक ठिकाणी हिंसाचार केला. इंस्टाग्रामच्या खोट्या अकाऊंटच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणार्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.