जळगाव येथे दंगलखोर धर्मांधांना समजवणार्या पोलिसांवर दगडफेक !
|
जळगाव – येथे धर्मांधांकडून अंडी फेकण्याच्या मस्करीतून झालेल्या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. या वेळी पोलीस धर्मांधांना समजावण्यासाठी गेले असता धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. दंगलखोरांनी ४ वाहनांचीही तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली. पोलिसांनी आणखी बंदोबस्त मागवून जमाव पांगवण्यात आला.
पोलिसांनी २५ जणांच्या विरोधात स्वतःहून तक्रार प्रविष्ट करत दंगल, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी जिशांत, शाकीब फारुख पटेल, उमर उपाख्य गोलू जावेद शेख, परवेज उपाख्य तिरंग खान युनूस खान, रफिक मुसा पटेल, सय्यद आकीब सय्यद वाहेद, अफसर जाकीर शेख, नईम बंडू शिकलीकर यांसह १० ते १२ जणांना अटक केली.
संपादकीय भूमिका
|