खलिस्तानी समर्थक आतंकवादी अमृतपाल सिंह याला ‘एन्.आय.ए.’ ने घेतले कह्यात !
नवी देहली – खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित असलेल्या आतंकवादी अमृतपाल सिंह याला नुकतेच फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले. अमृतपाल सिंह देहली विमानतळावर येताच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) त्याला अटक केली.
पंजाबमधील मोगा येथील रहिवासी असलेला अमृतपाल सिंह बराच काळ फिलिपाइन्समध्ये होता. त्याच्या सांगण्यावरून पंजाबमध्ये अनेक हिंसक घटनाही घडल्या होत्या. इंटरपोल आणि आंतरराष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या साहाय्यामुळे भारताला हे मोठे यश प्राप्त झाले आहे.