पुणे येथे कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या साहाय्यक निरीक्षकास मारहाण !
पुणे – येथे अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या साहाय्यक निरीक्षकासह सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी प्रशांत कोळेकर यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार प्रशांत कोळेकर हे महापालिकेत साहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आहेत. ते ए.आय.एस्.एस्.एम्.एस्. कॉलेजजवळ कैलास स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची कारवाई करत होते. त्या वेळी ही कारवाई न करण्यासाठी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच सुरक्षा रक्षक आकाश लोखंडे यांनाही मारहाण करून डोक्यात लोखंडी झार्याने मारून घायाळ केले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यापैकी ५ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिका‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशी वृत्ती असणार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |