सोन्याची तस्करी कपड्यांमध्ये लपवून करणार्या धर्मांधाला अटक !
सीमाशुल्क विभागाची कारवाई !
४ किलो २६५ ग्रॅम सोने जप्त
मुंबई – सोन्याची तस्करी कपड्यांमध्ये लपवून करणारा बिहारमधील जमिउल्ला अहमद (वय ३९ वर्षे) याला सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. त्याने विशिष्ट पद्धतीने शिवलेल्या कपड्यांमध्ये सोने लपवले होते. त्याच्याकडून ४ किलो २६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सव्वादोन कोटी रुपये आहे. या प्रकरणी सीमाशुल्क विभागातील अधिकारी अन्वेषण करत आहेत. त्याने जीन्स, अंतर्वस्त्र, पायात घातलेली पट्टी यांच्यात सोने लपवले होते. कपड्यात दडवलेल्या छोट्या पाकिटांमध्ये भुकटी स्वरूपात सोने असल्याचे उघडकीस झाले
संपादकीय भूमिकाविमानतळावरील सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणांत धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यानेच असे प्रकार वारंवार घडतात, हे लक्षात घ्या ! |