हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करतांना श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवून हिंदु धर्माचा प्रचार करणारे लोकेषणाशून्य नेते बिपीनचंद्र पाल !
आज देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विन्रम अभिवादन !
‘देशभक्त बिपीनचंद्र पाल हे लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय यांच्यासह नाव घेतले जाणारे स्वातंत्र्य आंदोलनातील महान पुढारी होते. ‘लोकांनी आपल्याला महात्मा म्हणावे’, अशी लालसा त्यांना नव्हती. भारताला स्वातंत्र्य मिळावे आणि ते परिवर्तन होतांना तो धडधाकट रहावा, इतकीच न्यूनतम इच्छा त्यांनी बाळगली होती. श्रीकृष्ण हा त्यांचा आदर्श होता. काँग्रेस पक्ष त्याच्या आयुष्याची गेली १२४ वर्षे हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करत जगत आला आहे; परंतु पक्ष म्हणून काँग्रेसने या नव्या विचारधारेवर पुरेसे साहित्य निर्माण केलेले नाही. जे थोडेसे साहित्य उपलब्ध आहे, त्यावरून आपली अशी समजूत होते की, प्रारंभापासूनच या संघटनेने हिंदु धर्माच्या विरुद्ध प्रचार केला आहे; पण तसे खरे नाही. बिपिनचंद्र पाल यांनी हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करतांना एखादा ख्रिस्ती पंथप्रचारक ‘बायबल’चा गौरव करू शकणार नाही, इतका हिंदु धर्माचा प्रचार केला आहे.’