हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?
कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी पुन्हा एकदा काँग्रेसचे सिद्धरामय्या यांना मिळाली आहे. आज २० मे या दिवशी त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या, तर पुढील अडीच वर्षे डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री पद भूषवतील. कर्नाटकातील जनतेने भाजपचा पराभव करून काँग्रेसला डोक्यावर घेतलेले आहे. सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी पार्श्वभूमी सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे काँग्रेसींचे वर्चस्व हिंदूंसाठी डोकेदुखीही ठरू शकते, हे निश्चित ! ‘सिद्धरामय्या यांच्या हातातील कर्नाटकातील पहिल्या अडीच वर्षांची सत्ता कशी असेल ?’, हा प्रश्न सर्वांनाच आहे. लवकरच त्याची उत्तरेही सापडतील. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी श्रीराम मंदिरात जाऊन पूजा केली होती. काही वर्षांपूर्वी याच महाशयांनी ‘देवावरील विश्वास म्हणजे मूर्खपणा’, असे म्हटले होते. एकीकडे हिंदुत्वाला विरोध करायचा आणि दुसरीकडे स्वतःच राममंदिरात जायचे, हा दुटप्पीपणा नव्हे का ? ही त्यांची फसवेगिरी हिंदू पुरेपूर जाणून आहेत. सत्तासुखासाठी हपापलेल्यांना अशा वेळी श्रीराम हाच तारणहार वाटतो. ‘राममंदिराला माध्यम बनवून राजकीय लाभ उठवणार्यांच्या मी विरोधात आहे. भाजप राजकीय लाभासाठी राममंदिराचा वापर करून घेत आहे’, असे सिद्धरामय्या म्हणाले होते. प्रत्यक्षात स्वतःच्या सत्ताकाळात इतकी वर्षे काँग्रेसने मुसलमानांना अनेक सवलती दिल्या, त्यांचाच लाळघोटेपणा केला, मग या माध्यमातून राजकीय लाभ उठवणार्या काँग्रेसला सिद्धरामय्या यांनी का बरे विरोध केला नाही ? एप्रिल २०२३ मध्ये सिद्धरामय्या यांनी म्हटले होते, ‘मी पुन्हा मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना ४ टक्के आरक्षण देईन.’ सिद्धरामय्या जर स्वतःला हिंदु म्हणवून घेतात, तर त्यांना ‘हिंदूंना आरक्षण द्यावे’, असे का वाटले नाही ? स्वतः हिंदु असूनही स्वधर्मीय बांधवांविषयी असा दुटप्पीपणा करणारे सिद्धरामय्या धर्मद्वेष्टेच होत ! मुसलमानांसाठी ‘सिद्धरामय्या म्हणजे जणू त्यांचे पालकच आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यातूनच कर्नाटकातील हिंदूंनी आपले भवितव्य काय आहे, ते ओळखून सजग व्हावे. काँग्रेसचा पुळका असणार्या आणि स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवणार्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा. आतापर्यंतच्या सत्ताकाळात काँग्रेसने जातीच्या आधारावर आरक्षणाद्वारे समाजामध्ये फूट पाडली. आता कर्नाटकमध्ये तो प्रकार धर्माच्या संदर्भात होणारच आहे.
सिद्धरामय्या यांचा हिंदुद्वेष !
सिद्धरामय्या हे याआधीही कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कारकीर्दीत अनेक हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या धर्मांधांकडून हत्या झाल्या होत्या. या हत्यांमागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या संघटनेचा हात असल्याचा संशय आहे; मात्र त्या दिशेने अन्वेषणच केले गेले नाही. भाजपचे तत्कालीन खासदार प्रल्हाद जोशी यांनीही या सत्यतेला पुष्टी दिली होती. त्यामुळे आता पुन्हा अशा हत्यांची प्रकरणे समोर आल्यास कुणालाही वेगळे वाटणार नाही. अर्थात्च असे घडायला नको, यासाठी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ यांनीही सतर्क रहायला हवे. याआधी एखाद्या निधर्मी किंवा साम्यवादी नेत्याची हत्या झाल्यास त्याचे खापर सर्रास हिंदुत्वनिष्ठांवर फोडले जायचे. या हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती आतातरी व्हायला नको. सिद्धरामय्या हे याआधी मुख्यमंत्री असतांना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या १ सहस्र ७०० कार्यकर्त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली होती. आता पुन्हा असा प्रकार घडल्यास हिंदू काय करणार आहेत ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना कर्नाटकात पुन्हा सक्रीय होऊ नये, यासाठीही हिंदूंनी कृतीशील पावले उचलायला हवीत. हिंदूंचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे दायित्व आहे.
सिद्धरामय्या म्हटले की, त्यांचे टिपू सुलतानप्रेम काही नवीन नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक ठिकाणी क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ज्या टिपूने १ दिवसात ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले, त्याच टिपूची जयंती हिंदूबहुल भारतात साजरी होणे याहून संतापजनक ते काय ? तेव्हाही टिपूची जयंती साजरी करण्याच्या विरोधात अनेक हिंदूंनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. सिद्धरामय्या यांनी हिंदुत्वनिष्ठांचा विरोध डावलून राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही लागू केला होता. हिंदूंनी आता पुन्हा रस्त्यावर उतरण्यासाठी सिद्ध व्हायला हवे; कारण मुसलमानप्रेमी आणि मुसलमानांसाठी वाटेल ते करण्याची सिद्धता असणारी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसणार आहे. ‘कोणत्याही अन्य धर्मांपेक्षा हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव या गोष्टींना पाठिंबा दिला जातो’, असे हिंदुद्वेषी विधान सिद्धरामय्या यांनी केले होते. याविषयीचे पुरावे ते निश्चितच सादर करू शकणार नाहीत; कारण हत्या, हिंसा आणि भेदभाव या गोष्टी कोणत्या धर्मामध्ये घडतात, हे भारतीय नागरिक जाणून आहेत. सिद्धरामय्या यांनी हिजाब, गोहत्या यांचेही वेळोवेळी समर्थन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हीन लेखले, त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यावर कोणती पावले उचलतील, हे वेगळे सांगायला नको.
हिंदूंची अग्नीपरीक्षा !
वर्ष २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ‘सिद्धरामय्या ‘हिंदुविरोधी’ असल्याचा प्रचार करण्यात आला होता’; पण ते खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सिद्धरामय्या यांची कारकीर्द पहाता ‘हा प्रचार खरा कि खोटा ?’ ते जनतेनेच ठरवावे. स्वतःला हिंदु म्हणवणार्या; पण सत्तेसाठी देव, देश, धर्म आणि तत्त्व यांना तिलांजली देणार्या सिद्धरामय्या यांचा खरा (हिंदुद्वेषी) चेहरा सूज्ञ हिंदु ओळखून आहेत ! आता कर्नाटकातील हिंदूंनी जागे होऊन मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी उचलल्या जाणार्या प्रत्येक पावलाला संघटितपणे विरोध करावा. मुसलमान आणि आतंकवादी यांच्या कल्याणाचे (?) घातक मनसुबे सिद्धरामय्यांनी यापूर्वी रचलेले असून त्याला वैधमार्गाने विरोध करण्याचे काम हिंदूंना करावे लागणार आहे. भारतातील सर्वत्रच्या हिंदूंनी कर्नाटकातील हिंदूंना साहाय्य करावे आणि हिंदुद्वेषाची शिकार होण्यापासून त्यांना वाचवावे.
कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! |