गोव्यात प्रथमच ‘सी २०’ परिषदेचे आयोजन !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आयोजकांपैकी एक !
पणजी (गोवा) – भारताच्या अध्यक्षतेखालील ‘जी २०’ या २० देशांच्या समुहाच्या अंतर्गत ‘सी २०’ अर्थात् ‘सिव्हिल २०’ हा संलग्न गट निर्माण करण्यात आला आहे. येत्या २७ मे यादिवशी वास्को, गोवा येथे होणारी ‘सी २०’ परिषद गोवा सरकारसह ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (गोवा)’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवन (नवी देहली)’ या संस्थांच्या पुढाकाराने होणार आहे.
या ‘सिव्हिल २०’ परिषदेच्या अंतर्गत देशभरात आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, तंत्रज्ञान, पारंपरिक कला, संस्कृतीचे जतन अन् संवर्धन आदी १५ प्रकारचे विविध गट कार्यरत करण्यात आले आहेत. त्या १५ पैकी ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर परिषद असणार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या ‘सिव्हिल २०’ परिषदांतील धोरणे आध्यात्मिक दृष्टीकोनांचा अवलंब करून बनवावीत, अशी सूचना केली आहे. भारतातील ‘सिव्हिल २०’ परिषदेच्या अध्यक्षस्थानी ‘माता अमृतानंदमयी मठा’च्या संस्थापिका प.पू. माता अमृतानंदमयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेतील ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर देश-विदेशांतील १७ मान्यवर आणि अभ्यासू वक्ते संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे आणि सांस्कृतिकमंत्री श्री. गोविंद गावडे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रसिद्धीपत्रक –
|