(म्हणे) ‘राज्यात मोर्चे काढून अश्लाघ्य भाषा वापरणार्यांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी !’
हिंदुद्वेष नसानसात भरलेले काँग्रेसचे हुसेन दलवाई !
नाशिक – मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगेन की, तुम्ही त्र्यंबकेश्वर धूप प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती करा; पण ज्या लोकांनी राज्यभर मोर्चे काढून अश्लाघ्य भाषा वापरली आहे, त्यांच्या विरोधातही काहीतरी करा. ‘त्या’ १०-१२ संघटना आहेत, त्यांना कुठला निधी मिळतो ? ते काय करतात ? लोकांना काय शिकवतात त्यांची चौकशी करा, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी १८ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना उधळली. (गेल्या अनेक वर्षांपासून देशात आतंकवादी कारवाया करणार्या आतंकवादी संघटनांना निधी कुठून मिळतो ? आतंकवाद्यांना देशात आसरा कोण देतो ? याची आतापर्यंत हुसेन दलवाई यांनी कधी चौकशी केली आहे का ? ‘केवळ हिंदुद्वेषापोटी अशी मागणी करणार्या दलवाई यांच्यावरच गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे’, असे म्हटल्यास त्यात चूक
काय ? – संपादक) हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात जिथे वाद झाला, त्या मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ जाऊन दर्शन घेतले. (ढोंगी हुसेन दलवाई ! त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसतांना ते मंदिरात जाऊन नसती उठाठेव करतातच कशाला ? मशिदीत जाऊन हिंदूंनी त्यांची उपासना केली तर चालेल का ?- संपादक)
हुसेन दलवाई म्हणाले की, धूप अर्पण करण्याची ही परंपरा पुष्कळ मोठी आहे. गेल्या १०० वर्षांपासून ही परंपरा चालते. बाबा शहा यांचा संदल येथे येतो, ती चांगली गोष्ट आहे. येथे धार्मिक सलोखा आहे. ज्यांनी धूप अर्पण केला, त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट जे धूप अर्पण करणार्यांच्या विरोधात आहेत, त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला.’’ (मंदिरात घुसणार्या मुसलमानांच्या विरोधात साधा ‘ब्र’ही न काढणार्या दलवाई यांना हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु नेते यांच्याविषयी किती तिटकारा आहे, हे यातून दिसून येते. – संपादक)
धार्मिक सलोखा बिघडवणारे केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. राज्यभर मोर्चे काढून धार्मिक सलोखा बिघडवला जात असून ते मोर्च्यात अश्लाघ्य भाषा वापरतात. (दलवाई यांनी राज्यात वाढलेल्या आतंकवादी संघटनांविषयी बोलावे. याविषयी ते मूग गिळून गप्प का ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टीका करण्याऐवजी दलवाई यांनी ‘प्रत्येक आतंकवादी मुसलमान का असतो ?’ याचे उत्तर प्रथम द्यावे. – संपादक)