सनातनचा साधक कु. शिवानंद देशपांडे याचे इयत्ता १० वीच्या परीक्षेतील सुयश !
‘संस्कृत’ विषयात १०० पैकी १०० गुण !
यवतमाळ, १९ मे (वार्ता.) – येथील सनातनचा साधक कु. शिवानंद विशाल देशपांडे याने इयत्ता १० च्या ‘सी.बी.एस्.सी.’च्या परीक्षेत ९३.६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. येथील सनातनचे साधक श्री. विशाल देशपांडे यांचा कु. शिवानंद हा मुलगा आहे. शहरातील महर्षि विद्यामंदिर शाळेत तो शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे कु. शिवानंद याला ‘संस्कृत’ या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
या यशाविषयी कु. शिवानंद म्हणाला की, महर्षि विद्यामंदिर शाळेतील मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, तसेच सर्व शिक्षक यांनी निरपेक्षपणे केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आज हे यश प्राप्त करू शकलो. नियमितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना, कृतज्ञता, तसेच साष्टांग दंडवत करून क्षमायाचना, तसेच कुलदेवता आणि गणपति या देवतांचा नामजप करत अभ्यास केला. अभ्यासाच्या खोलीत पटलासमोर सनातन-निर्मित गणपतीचे चित्र लावून नियमित अभ्यासाचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत अभ्यास पूर्ण न होताही एवढे गुण प्राप्त होणे, हे यश त्यांच्या आशीर्वादामुळेच प्राप्त झाले आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच हे यश प्राप्त झाले असून यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.