(म्हणे) ‘कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या नियंत्रणात असलेली अनेक एकर भूमी आम्हाला परत करा !’ – उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्ड
उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाची योगी आदित्यनाथ शासनाकडे मागणी !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मृत पावलेला कुख्यात गुंड अतिक अहमद आणि कारागृहात असलेला गुंड मुख्तार अंसारी यांनी वक्फ बोर्डाची अनेक एकर भूमी स्वत:च्या कह्यात घेतली होती. ‘ती पुन्हा आम्हाला देण्यात यावी’, अशी मागणी उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून केली आहे.
‘लाईव्ह हिन्दुस्तान’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रयागराज आणि लक्ष्मणपुरी येथे दोघा गुंडांचे कुटुंबीय आणि टोळ्या यांनी अनेक एकर भूमी हस्तगत केली होती. प्रयागराज प्रशासनाला अनेक वेळा पत्रे लिहूनही या भूमी आम्हाला परत मिळाल्या नाहीत, असे बोर्डाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. अहमदच्या हत्येनंतर त्याच्या अवैध संपत्तीचा शोध घेतांना त्याच्या टोळ्यांनी अनेक वर्षांपासून व्यावसायिक हेतूने भूमींवर नियंत्रण मिळवल्याचे समोर आले होते.
संपादकीय भूमिकामुळात ही सर्व भूमी शिया वक्फ बोर्डाची आहे कि उत्तरप्रदेश शासनाची आहे ? बोर्डानेच ती शासनाकडून अवैधरित्या कह्यात घेतली होती का, याची चौकशी होणे आवश्यक आहे ! अतिक अहमद याने ती भूमी अवैधपणे हस्तगत केली कि त्याच्या आतंकवादी कारवायांसाठी वक्फ बोर्डानेच ती त्याला देऊ केली होती ?, याचेही अन्वेषण होणे आवश्यक ! |