कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते दुसरीकडे हलवावेत ! – सर्वोच्च न्यायालय
नवी देहली – मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्या २ मासांत मृत्यू झाला. यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत ‘त्यांना दुसर्या उद्यानात हलवण्याचा विचार करावा’, असे सांगितले आहे. न्यायालयाने वन्यजीव तज्ञ समितीला १५ दिवसांत चित्ता टास्क फोर्सला याविषयी सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.