पंतप्रधान मोदी २८ मे या दिवशी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन !
जुन्या इमारतीपेक्षा १७ सहस्र चौरस मीटर मोठे
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २८ मे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पां’तर्गत ही इमारत बांधण्यात आली आहे. १० डिसेंबर २०२० या दिवशी नवीन त्रिकोणी आकाराच्या संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली, तर १५ जानेवारी २०२१ या दिवशी भवनाचे बांधकाम चालू झाले होते.
सध्याचे संसद भवन ९५ वर्षांपूर्वी वर्ष १९२७ मध्ये बांधण्यात आले होते. केंद्रशासनाने संसदेत सांगितले होते की, ही इमारत अधिक प्रमाणात वापरण्यात आली होती आणि ती खराब होत आहे. यासमवेतच लोकसभेच्या नव्या धोरणानंतर वाढणार्या खासदारांना बसण्यासाठी जुन्या इमारतीत पुरेशी जागा नाही.
नूतन संसद इमारतीची ही आहेत वैशिष्ट्ये !
|