कृपा करतोस न्याय देऊनी, कल्याण कर हे शनि !
तू सूर्य आणि छाया यांचा पुत्र । तुझी कीर्ती आहे सर्वत्र ।।
मंगळ, राहु आणि केतु ग्रह तुझे मित्र । तुझी दृष्टी फिरते सर्वत्र ।। १ ।।
तू कर्मफलाचा ज्ञाता । तू न्यायदंडाचा दाता ।।
सकल जिवांचा भाग्यविधाता । तुजला नमन करतो हे शनिदेवता ।। २ ।।
सौराष्ट्राच्या जन्मस्थानी । तुझी शक्ती वसे गुप्तस्थानी ।।
नवग्रहांमध्ये तू अग्रस्थानी । नमितो तुजला मनोमनी ।। ३ ।।
पूजन करते नील पुष्पांनी । वंदन करते तुजला तेल वाहूनी ।।
कृपा करतोस न्याय देऊनी । कल्याण कर हे शनि ।। ४ ।।
शनिलोकात आहे तुझा वास । साडेसातीचा होतो सर्वांना त्रास ।।
त्यजुनी माया आणि भोगविलास । तुला लागला कार्यपूर्तीचा ध्यास ।। ५ ।।
तू करतोस शिवाची उपासना । अन् कार्यरत असतोस रात्रंदिना ।।
भक्तगण करतात तुझी नित्य आराधना । तुझ्या शुभफलाने पूर्ण होते त्यांची मनोकामना ।। ६ ।।
तू ज्ञानी आणि धर्मनिष्ठ । तू न्यायी आणि तत्त्वनिष्ठ ।।
तू कर्तव्यदक्ष आणि ध्येयनिष्ठ । तुझी निंदा करतात मतिभ्रष्ट ।। ७ ।।
सर्व ग्रहांहून मंद असे तुझी गती । न्यायसंगत असे तुझी नीती ।।
सर्वत्र गाजते तुझी कीर्ती । देवगणही करतात तुझी स्तुती ।। ८ ।।
प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे शनिदेव, तुझी कृपा आम्हा सर्व साधकांवर अखंड राहो आणि तुझी कृपा या भारतदेशावर होऊन या राष्ट्राचा सर्वंकष उत्कर्ष होवो’, हीच तुझ्या चरणी आर्तभावाने प्रार्थना आहे. ‘श्रीगुरूंच्या कृपेने शनिदेवावर वरील काव्य स्फुरले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१८.५.२०२३)
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |