सत्वर भेट द्या मजला गुरुराया ।
भेट द्यावी सद्गुरुराया ।
शिणली माझी काया ।। १ ।।
तुम्हावीण जीवन व्यर्थ ।
दाखविला तुम्ही सेवेचा अर्थ ।। २ ।।
सेवा करण्या सत्वर आलो ।
नतमस्तक तुमच्या चरणी झालो ।। ३ ।।
सत्वर भेट द्या मजला गुरुराया ।
भक्तावर करता तुम्ही सदैव माया ।। ४ ।।
तुमच्या कृपेने देहभान विसरलो ।
भजनी तुमच्या दंग झालो ।। ५ ।।
सन्मार्ग तुम्ही दाविला ।
नाही कशाचा हेवा केला ।। ६ ।।
तुमच्या कृपेने भान हरपले ।
मन हे प्रफुल्लित झाले ।। ७ ।।
जीवनाची अशी ही व्यथा ।
जाणून घेतली सर्व ही कथा ।। ८ ।।
जाण्यासाठी मोक्षपदा ।
मार्ग दाविला सोपा साधा ।। ९ ।।
– श्री. सुरेश दाभोळकर, रानबांबुळी, ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.५.२०२१)