परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
१. वैद्य सुविनय दामले, कुडाळ
‘अतिशय भावपूर्ण आणि ‘न भूतो न भविष्यती’ अशा सोहळ्याचा आम्हाला लाभ झाला, याचा आम्हाला आनंद आहे. परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहिल्यावर माझी भावजागृती झाली.’
२. सौ. रूपाली रमेश आंगणे, डिगस, कुडाळ
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहाण्याची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होऊन भावजागृती होणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त दाखवण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात त्यांचे आगमन झाले. तेव्हा माझी भावजागृती झाली आणि त्यांच्या दर्शनाची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. ‘ते कसे दिसतात ? कसे बोलतात ? कसे चालतात ?’, हे मला पहायला मिळाले.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनाही पहाता आल्याने मला पुष्कळ धन्यता वाटली.
२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गुरुदेव बसलेल्या झुल्याला झोका देत असतांना भावजागृती होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गुरुदेवांच्या झुल्याला झोका देत असतांना माझी पुष्कळ भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहात होते. ‘गुरुमाऊली प्रत्यक्षात घरी आली आहे’, असे मला वाटले. ‘सगुणातील देव इतका सुंदर आहे, तर निर्गुणातील देव किती सुंदर असेल !’, याची कल्पना करू शकत नाही !’
३. सौ. मनीषा रवींद्र परब, ओरोस
‘आमच्या घरी सकाळी जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुदेवांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले. त्या वेळी गुरुदेवांच्या चरणांजवळ जे फूल वाहिलेले होते, ते रात्री १० वाजेपर्यंत टवटवीत होते.’
४. श्री. वासुदेव सडवेलकर, कुडाळ
४ अ. गुरुदेवांचे पांडुरंगाच्या रूपात दर्शन होणे आणि भावजागृती होणे : ‘परम दयाळू गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी मला फार आनंद झाला. त्या वेळी मला पांडुरंगाच्या रूपात गुरुदेवांचे दर्शन झाले. नंतर माझ्या अंगावर शहारे आले आणि माझा भाव जागृत झाला.’
५. सौ. वैष्णवी वामन परब, कुडाळ
अ. ‘सोहळ्याच्या दिवशी सकाळी परात्पर गुरुदेवांच्या स्वागतासाठी विष्णुतत्त्वाची रांगोळी काढत असतांना मला गुरुदेवांचे विष्णुरूप आणि त्यांच्या चरणांवर वाहिलेले कृष्णकमळ यांची आठवण आली.
आ. कार्यक्रम चालू झाल्यानंतर गुरुदेवांचे दर्शन होताच त्यांच्या पाठीमागे मला अखिल ब्रह्मांड आणि पांढरा प्रकाश दिसला.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरुदेवांना झोका देत असतांना ‘मी तेथे आहे’, असे वाटून मी मंत्रमुग्ध झाले.’
६. श्री. गिरीश चव्हाण, देवगड
अ. ‘परात्पर गुरुदेव श्रीरामाची वेशभूषा करून आसन ग्रहण करायला जात होते. तेव्हा ‘हा कार्यक्रम स्वर्गात चालू आहे आणि आपण गुरुदेवांच्या अगदी जवळ आहोत’, असे मला वाटले.
आ. त्या वेळी मला त्यांच्या आसनापर्यंत चैतन्याची एक पोकळी जाणवत होती.’
७. कु. श्रुति शाहाकार, देवगड
अ. ‘सोहळ्याच्या निमित्ताने मला तांत्रिक साहाय्य करण्याची सेवा मिळाली. सेवा करतांना मला सकारात्मकता वाटत होती आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही.
आ. जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गुरुदेवांच्या चरणांवर फुले वाहत होत्या, तेव्हा माझी भावजागृती झाली.
इ. गुरुदेवांनी प्रभु श्रीरामाची वेशभूषा केली होती. तेव्हा त्यांचे दर्शन घेतांना ‘हिंदु राष्ट्राची पहाट जवळ आली आहे’, असे मला वाटत होते.’
८. सौ. संगीता कोळसुलकर, खारेपाटण
अ. ‘जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी मी गुरुदेवांच्या छायाचित्रासाठी अबोली आणि मोगरा यांची फुले काढून उत्साहाने हार बनवला. तेव्हा मला घरात चैतन्य जाणवत होते.
आ. मला माझ्या रुग्णाईत मुलासाठी नामजप करायचा असतो. माझ्या मनातील त्याविषयीचे विचार न्यून झाले आणि मला संपूर्ण एकाग्रतेने भावस्थितीत राहून जन्मसोहळा पहाता आला.
९. कु. नीना कोळसुलकर, खारेपाटण
अ. ‘जन्मोत्सवाच्या दिवशी वडिलांनी गुरुदेवांच्या छायाचित्राची भावपूर्ण पूजा केली. आईने केलेला पुष्पहार गुरुदेवांच्या छायाचित्राला घातल्यावर पुष्कळ चैतन्य आणि ऊर्जा जाणवत होती.
आ. ‘गुरुदेवांच्या छायाचित्राकडे सतत पहात रहावे’, असे मला वाटत होते. छायाचित्राकडे पाहून माझा भाव जागृत झाला. त्या वेळी माझा नामजपही भावपूर्ण झाला.
इ. विष्णुतत्त्वाची रांगोळी काढतांना माझा भाव जागृत होत होता.
ई. सोहळ्यात गुरुदेव आपली दृष्टी सगळीकडे फिरवून नंतर डोळे बंद करत होते. त्या वेळी ‘गुरुदेव आपल्या कृपाकटाक्षाने आम्हाला आश्वस्त करत आहेत आणि आमची आर्त हाक ऐकत आहेत’, असे मला जाणवले.
उ. साधिका करत असलेले नृत्य पहातांना ‘ते मीच करत आहे’, असे मला जाणवले. त्या नृत्यातून मला क्षात्रतेज आणि आनंद याची अनुभूती घेता आली.
ऊ. वातावरणात पुष्कळ पालट झाला होता.
ए. गुरुदेवांच्या कृपेने या आपत्काळात माझ्या मनामध्ये स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् चैतन्य मिळाले.’
१०. श्री. भास्कर काजरेकर, कणकवली
‘सोहळ्याच्या दिवशी घराची स्वच्छता आणि शुद्धीकरण करतांना ‘परात्पर गुरुदेव त्यांच्या नेहमीच्या वेशात, म्हणजे पांढरी विजार आणि पांढरा सदरा घालून पूर्ण घरात फिरत आहेत’, असे मला जाणवले.’
११. श्री. शिवाजी देसाई, मालवण
अ. ‘प्रत्यक्ष आश्रमात, संतसहवासात आणि गुरुदेवांच्या समोर बसून सोहळा पहात आहोत’, असे मला अनुभवता आले.
आ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चेहर्यातून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असून तेथून दृष्टी हटवू नये’, असे मला वाटत होते.
१२. श्री. राजेंद्र तांबोसकर, तळवडे, ता. सावंतवाडी,
१२ अ. कार्यक्रम चालू झाल्यावर सकाळपासून होत असलेला डोके आणि डोळे दुखण्याचा त्रास न्यून होऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता येणे अन् त्यातून आनंद मिळून रात्री शांत झोप लागणे आणि दुसर्या दिवशी चांगले वाटणे : ‘कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच माझे डोके जड झाले होते. माझे डोके आणि डोळेही पुष्कळ दुखत होते. ‘कार्यक्रम बघायला मिळेल कि नाही ?’, अशी भीती मला वाटत होती. कार्यक्रम चालू झाल्यावर माझ्या डोळ्यांची जळजळ न्यून झाली. मला कार्यक्रम निर्विघ्नपणे बघता आला आणि आनंद मिळाला. मला बरेच दिवस शांत झोप लागली नव्हती; पण त्या रात्री शांत झोप लागली आणि दुसर्या दिवशी चांगले वाटले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ५.५.२०२१)
श्री. दीपक कांबळी (धर्मप्रेमी), तरवाडी, जामसंडे, ता. देवगडअ. ‘हा सोहळा प्रत्यक्ष देवलोकात चालू आहे’, असे मी अनुभवत होतो. आ. कुटुंबातील सदस्यांसह सोहळा पहात असतांना ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, अशी माझी स्थिती झाली होती. इ. सोहळ्याच्या वेळी माझे मन निर्विचार आणि शांत झाले होते. ई. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रच आसनावर विराजमान झाले आहेत’, असे जाणवत होते.’ |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |